बिचुकले यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी

बिचुकले यांना बिग बॉसच्या घरातून  बाहेर काढण्याची मागणी

मराठी बिग बॉसमधून स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना बाहेर काढण्याची मागणी माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री यांना केली. बिग बॉसमधील स्पर्धक रूपाली भोसले व बिचुकले यांच्यात वादावादी झाली, या पार्श्वभूमीवर बिचुकलेंना बाहेर काढण्याची मागणी केली आहे. 

दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका टास्कमध्ये स्पर्धक रूपाली भोसले व बिचुकले यांच्यात जोरदार वादावादी झाली. यानंतर रूपालीने बिचुकलेंवर आरोप करत त्यांना मुलीची शपथ घेण्यास सांगितले. यामुळे चिडलेल्या बिचुकलेंनी रूपालीला अपशब्द वापरत वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अपमानास्पद टिप्पणी केली.

बिचुकलेंचे वक्तव्य हे घटस्फोटित महिला, सिंगल मदर महिलांचा अपमान करणारे आहे, असे वक्तव्य भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी म्हटले आहे. अभिजीत बिचकुलेंवर कारवाई करावी यामागणीसाठी रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संबंधित वाहिनी आणि अभिजीत बिचुकलेंवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा रितू तावडे यांनी दिला.  

Web Title: demand to action against bigg boss marathi abhijeet bichukale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com