बसचा चालक आजारी असल्याने, कंडक्टरने अतिशहाणपणा  दाखवत एसटीची सूत्रं हाती घेतली अन्...

बसचा चालक आजारी असल्याने, कंडक्टरने अतिशहाणपणा  दाखवत एसटीची सूत्रं हाती घेतली अन्...

गडचिरोलीत एसटीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कोठीहून अहेरी येथे जाणाऱी बस उलटून तब्बल 11 प्रवासी जखमी झाले आहेत.

या बसचा चालक आजारी असल्याने, कंडक्टरने अतिशहाणपणा  दाखवत एसटीची सूत्रं हाती घेतली अन् निसरड्या रस्त्यावर अंदाज न आल्याने, कंडक्टरचं नियंत्रण सुटून एसटी रस्त्याच्या कडेला कलंडली.

सुदैवाने या बसमध्ये जास्त प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी कंडक्टरचं असं जीवघेणं धाडस कितपत योग्य आहे. असा सवाल या दुर्घटनेनंतर उपस्थित होऊ लागला आहे.
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com