पार्किंग न करु दिल्याने पुण्यात वाहानांची तोडफोड

पार्किंग न करु दिल्याने पुण्यात वाहानांची तोडफोड

पुणे (कॅन्टोन्मेंट) : पुण्यात दुकानासमोर वाहन पार्किंग न करू दिल्याने एका टोळीकडून दुकान व वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.  हा सर्व प्रकार काल सोमवारी दुपारी हरकानगरमध्ये घडला असून सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे

हरकानगर येथे श्री व्यकंटेश झेरॉक्स स्टेशनरीच्या दुकानासमोर राहणार उमेश गाडियाल (मंगळवार पेठ) या युवकाने दुचाकी वाहन पार्किंग केले होते.  यावेळी दुकानाचा मालक सनी म्हेत्रे या युवकाने येथे पार्किंग करू नको असे सांगितले. यावेळी उमेशने सनी याला शिवीगाळ करून ''दुकानाबाहेर ये'' असे सांगत धमकावले. पाऊण तासातच सात ते आठ मुलांची टोळी घेऊन दुकानाची तोडफोड करत चार चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात केली. यावेळी नोतेश निलेश म्हत्रे (वय 17) यामुलाला मारहाण करण्यात आली. तसेच एका युवतीला ही मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार 30 सप्टेंबरला दुपारी अडीचच्या दरम्यान झाला असून सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. 

यावेळी सनी म्हेत्रे यांनी कासेवाडी पोलीस चौकी येथे तक्रार केली आहे. मात्र दुसरा दिवस उलटून ही याप्रकारची नोंद घेण्यात आली नाही. यावेळी पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांनी तपास सुरु असल्याचे सांगितले. 


Web Title: Gangs vandalized for not allowing parking in front of 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com