गांज्याची लॅब सुरु केली सोडली इंजिनेरींग... कोण आहे हा हुशार

गांज्याची लॅब सुरु केली सोडली इंजिनेरींग... कोण आहे हा हुशार

हा आहे निखल शर्मा. वय 26 वर्ष इंजिनिअर होता होता राहिला. शेतीकडे वळला. घरात गांजाची शेती केली आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

चेंबूर, आरसीएफ आणि देवनार परिसरातून गांजा तसंच इतर ड्रग्ज पुरवले जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.  त्यानुसार पोलिसांनी निखिल शर्माला ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीत निखिलने जी माहिती दिली. ती ऐकून पोलिसही चक्रावले. 

निखिलेने गांजा पिकवण्यासाठी हायड्रोपिनिक ग्रो सिस्टमचा वापर केला. दुष्काळात हे तंत्र वापरुन चारा निर्मिती केली जाते. हेच तंत्र त्याने इंटरनेटवरुन अवगत केलं. आणि तो फसला. दुर्दैव बघा. पोराने इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडलं. पण गांजाची शेती मात्र मन लावून शिकून घेतली. आणि स्वतःसोबतच इतरांचंही भविष्य त्याने धोक्यात घातलं.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com