राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  खुशखबर

 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  खुशखबर
Good news for Government Employees


मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  खुशखबर आहे. आतापर्यंत या कर्मचा-यांना पगार दिवाळीनंतर मिळत होता. त्यामुळे त्यांना दिवाळीची खरेदी करायला बराच विलंब जावा लागत असेल मात्र आता कर्मचा-यांना दिलासा मिळणार आहे. कारण ऑक्टोबरचा पगार दिवाळीआधीच, म्हणजे 24 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे... तसंच दिवाळीपूर्वी निवृत्तीवेतनही देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे... याबाबतचे नव्याने परिपत्रक जारी करण्यात आलं आहे... याआधी 9 ऑक्टोबरला वित्त विभागाने लवकर पगारासाठी परिपत्रक काढले होते... मात्र वित्त विभागातील कर्मचारी निवडणुकीच्या कार्यक्रमात गुंतल्याचं कारण देत, निर्णय स्थगित केला होता... मात्र पुन्हा नव्याने परिपत्रक काढत, विवंचनेत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे... त्यानुसार 24 ऑक्टोबरआधीच हा पगार होण्याची चिन्हं आहेत...त्यामुळे शासकीय कर्मचा-यांना दिलासा मिळालाय..

Web Title -  Good news for Government Employees 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com