हरिद्वार इथं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं विसर्जन

हरिद्वार इथं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं विसर्जन

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं आज विसर्जन करण्यात आलं. हरिद्वार इथं श्रीदेवीच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं.. यावेळी बोनीकपूर भावूक झाले होते. 24 फेब्रुवारीला श्रीदेवीचं दुबईत निधन झालं होतं. मृत्यूची चौकशी झाल्यानंतर पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर गेल्या बुधवारी श्रीदेवीच्या शेवटच्या इच्छेनुसार पांढऱ्या शुभ्र फुलांमध्ये सजवलेल्या ट्रकमधून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीदेवीच्या अकाली निधनामुळे कपूर कुटुंबीयांसोबतच बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांमध्येही शोककळा पसरलीय. तीन दिवसांपूर्वी रामेश्वरममध्ये श्रीदेवीच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं होतं. 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com