मराठ्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा; शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया 

मराठ्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा; शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधवांची प्रतिक्रिया 

मराठा आरक्षणाची मागणी ही खुप जूनी आहेत, मात्र सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर नौटंकी केली, त्यामुळे मराठ्यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढावा, असे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे. 

जालना येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी (ता. 1) भेट दिली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी आमदार श्री. जाधव म्हणाले की मराठा आरक्षणावर 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. हे सरकार पण मराठा आरक्षणासंदर्भात वेळ काढूपणा करीत आहेत. त्यामुळे मराठ्यांनी एकत्र येऊन राजकीय पक्ष काढावा. पंकजा पालवे यांनी एका दिवसात 143 अध्यादेश काढले, मुख्यमंत्र्यांनी एक तरी मराठा आरक्षणाचा आध्यादेश काढावा. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येण्यास तीन महिने लागणार आसल्याच सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्री एक महिन्यात आरक्षण देतो, असे सांगत आहे. त्यामुळे एक महिना वाट पाहण्यासाठी हरकत नाही. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेली आंदोलने सुरुच राहिली पाहिजे, असे ही आमदार श्री. जाधव म्हणाले.

ती त्यांची व्यक्तीगत भूमिका- संजीव भोर
मराठ्यांनी राजकीय पक्ष काढावा ही आमदार हर्षवर्धन जाधव यांची व्यक्तीगत भूमिका आहे. मराठा क्रांती मोर्चाची ही भूमिका नाही, असे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीचे सदस्य संजीव भोर यांनी स्पष्ट केले आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com