कट ऑफ वाढणार; अकरावी प्रवेशासाठी कांटे की टक्कर

कट ऑफ वाढणार; अकरावी प्रवेशासाठी कांटे की टक्कर

दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थी, पालकांसमोर नवा प्रश्न उभा ठाकलाय, तो म्हणजे अकरावी प्रवेशाचा. कारण यंदा अकरावी प्रवेशासाठी कट ऑफ वाढणाराय. त्यातल्या त्यात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तच चिंतेचं वातावरण आहे. कारण सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई या मंडळाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जातात. तेच एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिले गेले नाहीत, त्यामुळं इतर मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या ८० हजारांच्या आसपास आहे, तर दुसरीकडे एसएससी बोर्डात ९० पेक्षा जास्त टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २६ हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळं नामांकित महाविद्यालयांतल्या अकरावी प्रवेश आता एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरणाराय. 

तर मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी केलंय. दरम्यान आशिष शेलार यांनी या प्रकरणी दखल घेतलीय. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार याची काळजी घेतली जाईल असंही ते म्हणाले.

दहावीचा पहिला मैलाचा दगड पार केल्यानंतर आता एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर हा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उभा आहे, आता याप्रकरणी सरकारनं तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना मदत करावी असा सूर उमटतोय.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com