नेत्यांचं भविष्य तर आपण ठरवलंय...पण तुमचं भविष्य येथे जाणून घ्या

नेत्यांचं भविष्य तर आपण ठरवलंय...पण तुमचं भविष्य येथे जाणून घ्या

आजचे दिनमान 
मेष :
 उत्साह, उमेद वाढेल. धाडस, जिद्द यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभणार आहे. 

वृषभ : अडचणी कमी होतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. कर्तृत्त्वाला विशेष संधी लाभेल. विद्यार्थ्यांना विशेष यश लाभेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. 

कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. गुंतवणुकीला, प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. 

सिंह : खर्च योग्य कामासाठी होणार आहेत. अनेक कामे वेगाने पार पाडाल. आर्थिक क्षेत्रात अत्यंत चांगले वातावरण असेल. 

कन्या : महत्त्वाची कामे पार पाडण्यास आजचा दिवस चांगला आहे. आगामी काही महिन्यांचे नियोजन आज करणे योग्य ठरेल. 

तूळ : व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. प्रवास सुखकर होणार आहेत. थोरामोठ्यांच्या आश्‍वासनावर विसंबून राहू नये. 

वृश्‍चिक : व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रांचे विशेष सहकार्य मिळेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. साडेसातीची तीव्रता हळूहळू जाणवेल. 

मकर : आजचा दिवस विलक्षण यशाचा आहे. शासकीय कामे मागी लागतील. शत्रुपीडा नाही. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. प्रवास सुखकर होणार आहेत. 

पंचांग
गुरुवार : वैशाख कृष्ण 5, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6, सूर्यास्त 7.05, चंद्रोदय सात्री 11.06, चंद्रास्त सकाळी 9.45, भारतीय सौर ज्येष्ठ 2, शके 1941.

Web Title: Horoscope and Panchang of 23 May 2019

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com