VIDEO | मोकळ्या रस्त्यांवर सुस्साट घोडे

VIDEO | मोकळ्या रस्त्यांवर सुस्साट घोडे


पुणे : पुण्यात येरवडा परिसरात शुक्रवारी रात्री घोड्याच्या बग्गीचा थरार पाहायला मिळाला. घोडे अचानक सुसाट सुटल्याने बग्गीमालक त्यांना आवरण्यासाठी दुचाकीवरून गेला, तो घोड्यांना रोखण्यात यशस्वी ठरला पण स्वतः खाली कोसळल्याने चाकाखाली आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात मध्यरात्री ही घटना घडली. घोडे बग्गीसह उधळल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण मिळविताना हा अपघात घडला. येरवडा परिसरातील ही घटना असून, बग्गी मालक जखमी झाला आहे. 

मध्यरात्री समारंभ संपवून परतत असताना दोन घोडे बग्गीसह अचानक सुसाट सुटले. बग्गी मालकाच्या हे लक्षात येताच त्याने दुचाकीसह त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण, नियंत्रण मिळविताना घोडा खाली कोसळल्याने त्याचेही नियंत्रण सुटले आणि तोही रस्त्यावर पडला. त्यामुळे बग्गीची दोन चाके त्याच्या अंगावरून गेली. 

Web Title: Watch video of an accident of horse and buggy in Pune
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com