हॉटेलमधून मागवलेल्या मांसात निघाला मानवी दात...

हॉटेलमधून मागवलेल्या मांसात निघाला मानवी दात...

लंडनः एका दांपत्याने हॉटेलमधून मांसाहारी पदार्थांची मागणी केली होती. परंतु, जेवण करत असताना त्यामध्ये मानवी दात निघाल्यामुळे खळबळ उडाली. या दांपत्याने फेसबुकवरून संबंधित छायाचित्रे व्हायरल केली आहेत.

वर्सेस्टर येथे ही घटना घडली आहे. येथील डेव्ह बुरोस (वय 38) व मॅकडोनप (वय 29) यांनी  न्यू टाऊन कॅन्टनीज टेकअवे नावाच्या एका चिनी हॉटेलमधून पोर्क करी (डुकराचं मांस असलेली रस्साभाजी) मागवली. दोघे जण जेवण करायला बसले तेंव्हा त्यांना त्यामध्ये एक विचित्र वस्तू दिसली. त्यांनी ती व्यवस्थित धुतल्यानंतर धक्काच बसला. कारण, तो मानवी दात होता. दोघांनी तत्काळ हॉटेल प्रशासनाशी संपर्क साधला शिवाय पोलिसांनाही कळवले.

हॉटेल प्रशासनाने आपली चूक लपविण्यासाठी दोघांना मोफत जेवणाची ऑफर दिली. पण, दोघांनी स्पष्टपणे नाकारली. काही वेळातच पोलिस हॉटेलमध्ये दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने हॉटेलची तपासणी केली. तेव्हा या हॉटेलने स्वच्छता आणि सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे आढळले. शिवाय, हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दात तपासले. पण, सर्वांचे दात व्यवस्थित होते. पोलिसांनी हॉटेलवर कोणतीही कारवाई न करण्याबरोबरच हॉटेलचे रेटिंग न घटवण्याचा निर्णय घेतला. मांसामधील दाताचे छायाचित्र त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

दरम्यान, सध्या चीनमधल्या कोरोना व्हायरसने जगभर दहशत पसरवली आहे. त्यामुळे जगभरातून चिनी वस्तू आणि पदार्थांची मागणीत दिवसेंदिवस घट होत आहे. अशा परिस्थितीत एका चिनी हॉटेलमधल्या मांसात माणसाचा दात सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: marathi news  A human tooth in a hotel order ...

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com