तो रस्त्यावरील खड्ड्यात झोपला, प्रशसनाला जाग आणण्यासाठी...

तो रस्त्यावरील खड्ड्यात झोपला, प्रशसनाला जाग आणण्यासाठी...

कोल्हापुरातल्या एका माणसानं चक्क भररस्त्यात लोळण घेत सर्व ट्रॅफिक अडवलं. खूप मिनतवाऱ्या केल्यानंतर त्यानं हे लोळण आंदोलन थांबवलं. पण त्यानं हे आंदोलन का केलं. रस्त्यातल्या खड्ड्यात तो का झोपला, पाहूया याबबतटं सविस्तर विश्लेषण...

भररस्त्यात हा माणूस का लोळतोय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा माणूस वेडा तर नाही ना, असंही तुमच्या डोक्यात आलं असेल. पण  असं काही नाही. हा माणूस रस्त्यात झोपलाय कारण त्याला गाढ झोपलेल्या प्रशासनाचे डोळे उघडायचेत. भर रस्त्यात लोळण घेतलेल्या या गृहस्थांचं नाव आहे विजय पोरे. कोल्हापूरमधल्या रंकाळा-गगनबावडा रोडवर फुलेवाडीजवळ त्यांच्या पत्नीच्या बाईकला अपघात झाला. या अपघाताचं कारण होतं रस्त्यातले भले मोठे खड्डे. खड्डे चुकवताना त्यांच्या पत्नीचं बाईकवरचं नियंत्रण सुटलं आणि त्या पडल्या. त्यांच्या पायाला,  हाताला दुखापत झाली. इतकंच नाही तर सोबत असलेल्या त्यांच्या मुलालाही मार लागला..
पत्नीला अपघात झाल्याचं कळताच, विजय पोरे संतापले पत्नीवर उपचार करून  अपघात झाला तिथं जाऊन धडकले. आणि ज्या खड्ड्यामुळे अपघात झाला  त्यातच त्यांनी लोळण घेतली. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे चांगलंच ट्रॅफिक जॅम झालं. पण आंदोलनाचं कारण कळल्यावर नागरिकांनीही त्यांनाच साथ दिली.
रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी पोरे यांनी हे आंदोलन केलं. त्यांचं हे आंदोलन चांगलंच गाजू लागलंय.

Web Title - Husband Agitation on raod due to his wife's accidenet

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com