कोरोनावर अजून कोणतंही औषध नसताना रुग्ण बरे होतात कसे? वाचा...

कोरोनावर अजून कोणतंही औषध नसताना रुग्ण बरे होतात कसे? वाचा...

आपण दिवसेंदिवस करोना रुग्णांचा आकडा वाढलेला पाहतोय. रोजच्या रोज नवे नवे रुग्ण देशात सापडत आहेत. मात्र यासोबतच काही रुग्ण बरे होऊन घरी जातायेत. हेही आपण ऐकतोय पाहतोय. मात्र हे होतंय कसं? जर करोना व्हायरसवर औषध सापडलं नाही, तर मग हे रुग्ण बरे होतात तरी कसे....?

तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता. ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्युनिटी असं म्हणतो. 

करोना व्हायरस झाल्यावर नेमकं होत काय? 

कोरोना व्हायरसचा विषाणू एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकल्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातो. अर्थात तो नाकातून किंवा तोंडातून शरीरात जातो. आणि त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप येतो. या विषाणूंसारखे असंख्य विषाणू आपल्यावर हल्ला करत असतात मात्र आपल्या शरीरात एक यंत्रणा असते जी आपल्याला या हल्ल्यापासून वाचवते. तीच म्हणजे रोग प्रतिकार क्षमता. आपल्या शरिरात पांढऱ्या पेशी हर्ट त्यांना आपण WBC म्हणतो. त्या आपल्याला या विषाणूंपासून वाचण्यास मदत करतात. 

मात्र कोरोनाचा हा विषाणू काहीसा वेगळा आहे. वेगळा म्हणजे खूप जास्त पावरफुल आहे. त्यामुळे होतं काय तर, आपल्या शरीराच्या त्या यंत्रणेला या विषाणूंची ओळख नसते. कारण तो प्राण्यांच्या शरीरातून माणसांच्या शरीरात जाऊ शकतो. आशा वेळी आपल्या त्या रोग प्रतिकारक यंत्रणेला त्या विष्णुशी सामना करायला थोडा वेळ लागतो. एकदाचा आपल्या शरीराच्या यंत्रणेला त्या विषाणूशी सामना करता आला. की रुग्ण बरा होऊ लागतो.

जसं आपल्याला बऱ्याचदा वायरल इन्फेक्शन होतं आणि आपण औषध नाही घेतलं तरी काही दिवसांनी आपल्याला बरं वाटायला लागतं. अगदी तसंच करोना विषाणूंशी आपलं शरीर आणि रोग प्रतिकारक क्षमता चांगली असेल तर आपण अगदी ठणठणीत बरे होऊ शकतो. 

त्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या गोष्टी करा...

1. व्यायाम करा.

2. फळं पालेभाज्या खा.

3. पाणी प्या. 

4. नीट झोप घ्या. 

5. सर्वात महत्वाचं म्हणजे ताण तणाव घेऊ नका. आनंदी राहा.

तर या गोष्टीमुळे तुम्ही रोग प्रतिकारक क्षमता वाढायला मदत होईल. 

Web Title - If Corona virus dont have any medicine then How patient is recover from corona 
   
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com