देशावर आर्थिक मंदीचं गडद सावट; नाशकात बॉश तर पिंपरीत टाटा मोटर्सला फटका

देशावर आर्थिक मंदीचं गडद सावट; नाशकात बॉश तर पिंपरीत टाटा मोटर्सला फटका

देशावर आलेलं आर्थीक मंदीचं सावट दिवसेंदिवस गडद होऊ लागलंय. या मंदीचा सर्वाधिक फटका हा ऑटोमोबाईल क्षेत्राला बसताना दिसतोय. महिंद्रा अँड महिंद्रा पाठोपाठ बॉश आणि टाटा कंपनीही मंदीच्या फेऱ्यात सापडलीय. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील अग्रेसर असणाऱ्या बॉश कंपनीचं उत्पादन पुढील आठ दिवस बंद राहणार आहे. तर पिंपरीतील टाटा मोटर्समध्येही आठ दिवस ब्लॉक क्लोजर घेण्यात येणारंय. त्यामुळे कामगारांची चिंता वाढलीय..

डिझेल गाड्यांमधील पार्ट्स बॉश कंपनीत तयार केले जातात. मात्र डिझेल गाड्यांचं उत्पादन घटल्यानं त्याचा परिणाम बॉश कंपनीच्या उत्पादनावर होऊ लागलाय. कंपनीचं उत्पादन घटलं आहे. तसेच बॉश कंपनीवर आधारित इतर लघू उद्योजकांनाही याचा फटका बसतोय. 10 ते 12 हजार कामगारांना या आर्थिक मंदीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातीय. तर पिंपरीतील टाटा मोटर्सनं देखील 28 ते 31 ऑगस्ट असे चार दिवस आणि 3 ते 6 सप्टेंबर असे चार दिवस मिळून आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर जाहीर केलाय.

ऐन सणासुदीच्या काळात मंदीचं सावट पसरल्यानं कामगार वर्ग धास्तावलाय. सरकारच्या उदासीनतेमुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री धोक्यात आल्याचा आरोप कामगारांकडून होतोय. दुसरीकडे कामगारांनी आपल्या दैनंदिन खर्चात कपात केलीय. मुलांच्या शिक्षणावर केला जाणारा खर्च असेल वा दैनंदीन जिवनात लागणाऱ्या वस्तू. लोकांची क्रयशक्ती कमी झाल्यानं स्वाभाविकच त्याचा फटका इतर उद्योगांनाही बसताना दिसतोय. 

Web Title : marathi news india under dark clouds of economic downturn bosh company to shut production for eight days

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com