सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी नवं वळण, वाचा सुशांतच्या अकाऊंटबद्दल मिळालेली ही माहिती

सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी नवं वळण, वाचा सुशांतच्या अकाऊंटबद्दल मिळालेली ही माहिती


सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होतायत. त्यातच आता सुशांतच्या सीएनं एक खुलासा केलाय. सुशांतच्या अकाऊंटमधून जास्त व्यवहार झालेलाच नाही असा खुलासा सुशांतच्या सीएनं केलाय. सुशांतच्या अकाऊंटमधून जवळपास 15 कोटींचा व्यवहार झाला असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. मात्र, त्याच्या अकाऊंटमध्ये जास्त पैसेच नव्हते असं सुशांतच्या सीएनं म्हटलंय. रियाच्या अकाऊंटमध्ये हजार रुपयेच पाठवले होते. आणि रियाच्या आईने 33 हजार रुपये पाठवले होते. याव्यतिरिक्त कोणताच मोठा व्यवहार झालेला नाही असं समोर आलंय.

दरम्यान, बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची ईडी चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताहेत. त्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आलीय. त्यामुळं कुणीतरी काहीतरी लपवत असल्याचं दिसतंय. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची ईडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

फडणवीसांनी जरी चौकशीची मागणी केली असली तरीही सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस योग्य रितीने करताहेत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलय. महाराष्ट्र पोलीस प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बिहारमध्ये तक्रार दाखल केली गेलीय़. त्यामुळे बिहार पोलीस अधिक तपासासाठी मुंबईत आले. मात्र हे प्रकरण मुंबई पोलीसांकडेच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान रिया चक्रवर्तीने तक्रार मुंबईत वर्ग करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टात केलीये. या विनंतीला बिहार सरकारने कॉव्हेट दाखल करत आव्हान दिलंय.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com