'ती' म्हणते; माझे 'नेकेड' फोटो पाहा पण पैसे द्या...

'ती' म्हणते; माझे 'नेकेड' फोटो पाहा पण पैसे द्या...
instagram model raises money for australia fires, australia fires, nude photos

न्यूयॉर्क : एका युवतीने सोशल मीडियावरून अनेकांना नग्न अवस्थेतील फोटो पाठवून तब्बल पाच कोटी रुपये कमावले. पण, कमावलेल्या पैशांचा तिने विधायक वापर केल्यामुळे सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे. केलन वार्ड (वय 20) असे युवतीचे नाव असून, ती मॉडेलिंगचे काम करते.

ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लाली असून, 50 कोटींहून अधिक प्राण्यांचा जीव गेला आहे. ऑस्ट्रेलियातील जीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. अमेरिकेत मॉडेल म्हणून काम करत असलेल्या केलन हिने मदत करण्याचे ठरवले. तिने नग्न अवस्थेतील फोटो नेटिझन्सना पाठवून 5 कोटी कमवले. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती सुधारण्यासाठी ही मदत म्हणून केली आहे, अशी माहिती एका युवकाने ट्विटरवरून दिली.

केलन अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये राहते. तिने नग्न अवस्थेतील छायाचित्रे पाठवण्यास सुरवात केल्यानंतर तिला विरोध झाला. न्यूड फोटोमुळे केलनचे इन्स्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियामध्ये भीषण आगीत भस्म झालेल्यांना मदत करण्याचे आवाहन तिने केले होते. पण, नग्न अवस्थेतील छायाचित्र पाठवून पैसे मागत असल्यामुळे अनेकांनी टीका केली. शिवाय, तिला जीवे मारण्याची आणि बलात्काराच्या धमक्याही आल्या होत्या.

केलनने सोशल मीडियावर म्हटले होते की, 'कोणाला मदत करायची असेल तर त्यांनी ऑस्ट्रेलियातील धर्मादाय संस्थेकडे किमान 700 रुपये पाठवावेत. यानंतर, निधी हस्तांतरणाची पावती देण्यात येईल. केलन हिने अपील केल्यानंतर काही वेळातच 20 हजार मेसेज तिला पाठवण्यात आले. यानंतर केलनने 5 कोटी रुपये जमवून दाखवले.'


दरम्यान, केलन हिने पैशांचा विधायक वापर केल्यामुळे तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्या जिद्दीला सलाम ठोकला आहे, तर दुसरीकडे टिकाही होत आहे.

Web Title: instagram model raises money for australia fires with nude photos before account deleted

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com