एका अधिकाऱ्यावर तीन विभागांचा पदभार

एका अधिकाऱ्यावर तीन विभागांचा पदभार

जळगाव : जिल्हा परिषदेत महत्त्वाच्या विभागात अधिकाऱ्यांची नियुक्‍ती झालेली नाही. यामुळे जिल्हा परिषदेत प्रभारी राज सुरू आहे. आता एक अधिकारी आणि तीन विभागांचा पदभार; अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि समाजकल्याण या दोन विभागाचा पदभार आला आहे. 


शासनाकडून स्थायी अधिकारी मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याकडे तीन विभागाचे पदभार देण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे सुटीवर गेल्याने त्यांचा पदभार पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे यांच्याकडे आजपासून देण्यात आला. विशेष म्हणजे श्री. लोखंडे यांच्याकडे आधीपासूनच पाणी व स्वच्छता विभागासह समाजकल्याण विभागाचा पदभार आहे. त्यातच त्यांच्याकडे सोमवारी सामान्य प्रशासन विभागाचेही पदभार देण्यात आले आहे.

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या प्रभारी राजाच अधिक असल्याचे चित्र आहे. महत्वाच्या आणि प्रशासकीय दृष्ट्या मोठ्या विभागातच कायम अधिकारी नसल्याने कामात अडचणी येतात. अनेक गावाला कागदोपत्री हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील एकही गाव हागणदारीमुक्त झालेले नाही. शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याने 31 डिसेंबरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी असणे आवश्‍यक असताना स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांच्याकडे इतर दोन विभागाचे प्रभारी पदभार देण्यात आले असल्याने उद्दिष्ट पूर्तीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: marathi news jalgaon jilha parishad prabhari raj

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com