जाणून घ्या काय आहे सी-60 कमांडो पथकाची ओळख?

जाणून घ्या काय आहे सी-60 कमांडो पथकाची ओळख?

सी-60 अभियानाचे 16 जवान नक्षली हल्ल्यात शहीद झाले ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हे जवान अतिशय प्रशिक्षित असतात. सीआरपीएफ जवानांपेक्षाही खडतर प्रशिक्षणातून हे जवान घडवले जातात.

नक्षल कारवायांवर नियंत्रणात या कमांडोची महत्वाची भुमिका असते. फक्त नक्षलविरोधी कारवायांसाठीच या जवानांची निर्मिती केली जाते. अत्यंत चपळाईनं हल्ला परतवून लावण्यात ते माहीर असतात. आदिवासी समाजातूनच त्यांची बहुतांशी निवड केली जाते. अशा प्रकारच्या सी-60 जवानांचा ताफा उडवल्याने आपले खुप मोठे नुकसान झाले आहे. स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) मधे काही चुका नक्कीच झाल्याचा संशय असून ही सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याची घंटा मानली जात आहे. 

काय आहे सी-60 कमांडो पथक

सी-60 ची पार्श्वभुमी
गडचिरोली जिल्हयाचे विभाजन झाल्यापासून नक्षल कारवायांमध्ये वाढ झाली. म्हुणून नक्षल कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठीच 01/12/1990 रोजी के.पी. रघुवंशी (पोलिस अधीक्षक, गडचिरोली) यांनी सी-60 ची स्थापना केली. तेव्हा सी-60 मध्ये फक्त 60 सक्षम व विशेष कमांडोची नेमणूक करण्यात आली व पोलिस निरीक्षक एस.व्ही. गुजर हे सी-60 चे पहिले प्रभारी अधिकारी होते.

गडचिरोली जिल्हयात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने परत त्यांचेवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली ला दोन विभागात विभाजन केले (उत्तर विभाग व दक्षिण विभाग) दक्षिण भागात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने प्राणहिता उपमुख्यालय येथे मार्च 1994 साली सी-60 चे दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली.

सी-60 चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. सी-60 पथक हे नक्षल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाते. सी-60 पथकाला यापूर्वी (क्रॅक कमांडो) या नावाने सुध्दा ओळखले जात होते.

सी-60 पथकाची धडक कारवाई
प्रशिक्षित सी-60 येथील जवान कठोर परिश्रम घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात जावून पहाडी व अतिदुर्गम भागामध्ये नक्षल विरोधी अभियान राबवितात. दरम्यान नक्षल चळवळी मध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाईकांना भेटून त्यांना आतमसमर्पण बाबत विविध शासकिय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करुन त्यांचा लाभ घेवण्यास त्यांचे मन परिवर्तन करुन त्यांना लोकशाही च्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. मात्र कट्टर नक्षल वरील शासकिय योजनेला व लोकशाहीला विरोध करुन लोकांना शासना विरुध्द भडकवतात अशा जहाल व कट्टर नक्षल्यांचा शोध घेवून खात्मा केला जातो. तसेच त्यांचे व नक्षल चळवळीस आळा घालण्यास बहुमोल सहकार्य केले तसेच अतिदुर्गम भागामध्ये जावून जनसंपर्क साधुन शासनांचे विविध धोरण लोकांसमोर मांडुन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम या जवान योग्यरित्या पार पाडत आहे.

जनतेच्या सुसंवाद व त्यांच्या समस्या
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अतिदुर्गम व जंगल भागात अशा ठिकाणी कोणीही शासकिय अधिकारी/ कर्मचारी जात नाही, अशा गावात सी-60 पथके जावून तेथिल लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतात (जसे - विज, रस्ते, तलाव, बोअरवेल, आरोग्य, शाळा, बससेवा) व मुख्यालय येथे आल्यावर वरीष्ठ अधिकारी यांना सांगुन संबंधीत कार्यालयाकडून सदर ची कामे पुर्ण होईल त्या अनुषंगाने इतर शासकिय विभागातील कार्यालयातील अधिकारी यांच्याशी चर्चा करुन सोडविण्याचा प्रयत्न करतो.

खेळ व व्यायाम
सि-60 पथके मुख्यालय येथे रिझर्व असतांना शारिरिक दृष्ट्या सक्षम राहण्याकरीता दररोज सकाळी शारिरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात. तसेच त्यांना नक्षल विरोध अभियान राबविणे करिता वेळोवेळी नक्षल टॅक्टीस बद्दलची माहिती दिली जाते. तसेच त्यांना नैतिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी मोटिवेशन लेक्चर , कमांडो मुव्हीज दाखविण्यात येते.

प्रशिक्षण
सी-60 पथकाला अति दुर्गम, संवेदनशिल व पहाडी भागात ऊन, वारा, पाऊस, दिवस व रात्री येणाऱ्या आव्हानांना व समस्येला तोंड देण्यासाठी शरिरिक व मानसिक दृष्टया सक्षम रहण्यासाठी त्यांना उच्च, विशेष व आधुनिक तंत्रद्यानाच्या पध्दतीचे विविध राज्यातील प्रशिक्षण संस्थेमध्ये जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी (ग्रे-हाऊन्स हैदराबाद, एन.एस.जी. मनेसर- हरियाणा - हजारीबाग, कांकेर, यु.ओ.टि.सी. नागपुर) येथे पाठवण्यात येते.

Web Title: know about C-60 Commando Squads

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com