धक्कादायक! या तरुण टीव्ही कलाकाराची आत्महत्या...

धक्कादायक! या तरुण टीव्ही कलाकाराची आत्महत्या...

मुंबई : टीव्ही सिरिअल विश्वातील प्रसिद्ध चेहरा असलेल्या कुशल पंजाबी याचा 37 व्या वर्षी धक्कादायक मृत्यू झाला आहे. त्याने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरातच आढळून आला.

त्याच्या निधनाचे कारण अद्यापही कळू शकलेले नाही. मात्र, अभिनेता करणवीर बोहराने सोशल मीडियावर त्याच्या निधनाची बातमी शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.

त्याने कुशलचा फोटो शेअर करत लिहिले आहे, ''तुझ्या निधनाच्या वृत्ताने मला खूप मोठी धक्का बसला आहे. मला अजूनही यावर विश्वास बसत नाही. मला खात्री आहे तु जिथे कोठे असशील, खूप खुश असशील. तु ज्याप्रकारे तुझं आयुष्य जगलं आहे त्याने मी खूप प्रेरित झाले आहे. तुझा डान्स, तुझी तंदुरुस्ती, तुला असलेलं बाईक्सचं वेड, तुझं बाबापण, तुझा नेहमी हसरा चेहरा आणि तसाच स्वभाव हे सर्व मला खूप प्रेरित करतं. मला तुझी खूप आठवण येईल.''

कुशलने अखेरचं काम इश्क में मरजावां या सिरिअलमध्ये काम केलं होतं. त्याने एका युरोपियन मुलीशी लग्न केल असून त्याला 2016मध्ये एक मुलगाही झाला आहे. त्याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, सलाम ए इश्क अशा अनेक फेमस चित्रपटांत काम केलं आहे. 

Web Title: TV Actor Kushal Punjabi Passes Away at 37

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com