Crime | घरात घुसून सात जणांवर कोयत्याने वार

Crime | घरात घुसून सात जणांवर कोयत्याने वार

लांजा ( रत्नागिरी ) - तालुक्यातील देवधे गुरववाडी येथे एका तरुणाने सात जणांवर कोयतीने वार केल्याने खळबळ उडाली आहे. प्रमोद गुरव असे या हल्लेखोराचे नाव आहे.  ही घटना बुधवारी (ता. 20) दुपारी साडेबारा ते पाऊणच्या सुमारास घडली. या घटनेनंतर हल्ला करणारा तरुण स्वतःहून लांजा पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी - प्रमोद गुरव याने गुरववाडी येथे घरात घुसून एकावर कोयतीने वार केला. हल्ल्याच्या घटनेनंतर तेथे मोठा गोंधळ उडाला. या गोंधळात त्याने दोन पुरुष आणि पाच महिलांवर कोयतीने सपासप वार केले. काहींना वार मानेवर केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे देवधेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

हल्ल्यातील जखमींची नावे अशी - 

अस्मिता संदीप गुरव (वय 34), भास्कर दत्तात्रय पाटकर (53), आयुष आशिष गुरव (5), वैशाली अशोक गुरव (52), अक्षता आशिष गुरव (20), सुलोचना मारुती गुरव (61), शिवांगी भास्कर पाटकर (52) अशी जखमींची नावे आहे.

घटनेने लाजा तालुक्यात खळबळ

दरम्यान, या घटनेनंतर प्रमोद गुरव स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसात हजर झाल्यानंतर सुद्धा तो काहीच घडले नाही अशा अविर्भावात वावरत होता. प्रमोद हा गुन्हेगारी पार्श्वभुमीचा असल्याचे समजते. यापूर्वी मारामारीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचेही समजते. तसेच तो व्यसनीही असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. हल्ल्यानंतर जखमी झालेल्या सातही जणांना लांजा रुग्णालयातून रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात येत होते. प्रमोदने हे कृत्य का केले, हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र या घटनेने लांज्यात खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेत आयुष आशिष गुरव हा पाच वर्षांचा बालक आणि वयस्क महिला हे गंभीर जखमी आहेत. 


Web Title: Youth Attack On Seven People Incidence In Lanja Taluka

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com