CCAला विरोध करताना भलत्यात गोष्टींचं नुकसान

CCAला विरोध करताना भलत्यात गोष्टींचं नुकसान

जामिया मिल्लिया इस्लामिया यूनिवर्सिटीमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. 
स्टुडंट सिटिजनशिप अमेंडमेंट ऍक्ट (CAA)चा विरोध केला जातोय. प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी विरोध दर्शवला. मिळालेल्या माहितीनुसार 15 डिसेंबरच्या संध्याकाळी पोलिसांनी युनिवर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आणि अश्रूधुरांच्या नळकांड्याही फोडल्या. तर दुसरीकडे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर आरोप केलाय. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. डीटीसी बसला आग लावली तसेच तोडफोड केल्यानं
हे आंदोलन अधिक तीव्र झालं होतं.

आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी आक्रोश निर्माण झालाय. जामिया युनिवर्सिटीचा एक विद्यार्थी कॅम्पसच्या गेटवर शर्ट काढून बसला होता. सध्या दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू आहे त्यामुळे जामियाचे विद्यार्थी आणि शिक्षकांनीत्याला शर्ट घालण्यास सांगितलं, फार विनवणी केल्यानंतर त्यानं चादर ओढत आपलं धरणं अखेर मागे घेतलं. युनिवर्सिटीच्या लायब्रेरीत तोडफोड करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावीअशी मागणी शहजाद यानं केली. तसेच पोलिसावर कारवाई न केल्यास 17 डिसेंबरला पुन्हा धरणे करणार असल्याचा इशारा त्यानं दिलाय. 

तर इकडे युनिवर्सिटीच्या वाईस चान्सलर नजमा अख्तर यांचं म्हणणं आहे की, 15 डिसेंबरचं आंदोलन विद्यार्थ्यांनी केलेलं नाही, तर हे आंदोलन  जामिया परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केलं होतं.  हे नागरिक आणि पोलिस एकमेकांना भिडले होते. हेच आंदोलनकर्ते युनिवर्सिटीचा गेट तोडून आत आले त्यावेळी लायब्रेरीत विद्यार्थी होते. यावेळी पोलिसांना विद्यार्थी आणि आंदोलनकर्ते यांच्यात फरकच दिसून आला नाही आणि पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांवरही हल्ला चढवला. यात बरेच विद्यार्थी जखमी झाले, इतका गोंधळ झाला की पोलिसांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com