महाबळेश्वरमधील तापमानात कमालीची घट

महाबळेश्वरमधील तापमानात कमालीची घट

महाबळेश्वर : आज (ता.9) येथील नागरिकांनी वेण्णा लेक परिसरात या हंगामातील सर्वात जास्त थंडीचा अनुभव घेतला. काही दिवसांपूर्वी राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच थंडीने पुन्हा डोके वर काढले असून राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. अशातच महाबळेश्वरमध्ये थंडीने उच्चांक गाठला. 

महाबळेश्वर येथे आज या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले. येथील बोट क्लबच्या जेटींवर, स्ट्रॉबेरीच्या मळ्यात, फुले, पाने, गाड्यांच्या टपावर, घराच्या पत्र्यांवर तसेच घराच्या बाहेर मळ्यामधील बादल्यांमध्ये साठवणूक केलेल्या पाण्यावर बर्फाचा पापुद्रा तयार झाला होता. 

वन विभागाच्या हद्दीतील स्मृतीवनमध्ये तर जणू काश्मीरमध्ये आल्याचा भास होत होता. येथील तापमान शून्य ते उणे दोन पर्यंत घसरल्याने पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना वेण्णा लेक परिसरातील विहंगम दृश्य पाहायला मिळाले.

Web Title: Mahabaleshwar experiences lowest temperature of the season

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com