पुणे शहरातील मृतांचा आकडा 50च्या वर, राज्यात कोरोनाचे चक्र थांबता थांबेना!

पुणे शहरातील मृतांचा आकडा 50च्या वर, राज्यात कोरोनाचे चक्र थांबता थांबेना!

पुणे शहरात कोरोनामुळे मृतांची संख्या ५०च्या वर जाऊन पोहोचलीये. यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोरोनामुळे कोंढाव्यातील ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. या महिलेवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मरण पावलेल्या महिलेला इतरही आजारांनी ग्रासले असल्याची माहिती आता समोर आलीये.

यासह, पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झालाय. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. या महिलेला 18 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. महिलेचे वय 62 होते.  किडनीचा आजाराच्या उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी तिला कोरोना झाल्याचं निदान झालं होतं

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पथक पुण्यात दाखल झालाय..हे पथक रुग्णालयं, कार्यालये आणि हॉटस्पॉट असलेल्या भागांना भेट देणार आहे. करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याने राज्यांच्या सहकार्यासाठी केंद्रानं ही  पथकं पाठवलीत. 

 कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २३२ झाली आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६,०९२ नमुन्यांपैकी ७१,६११ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील २३३६ रुग्णांपैकी १८९० रुग्ण हे लक्षणविरहित आहेत तर, ३९३ रुग्णांना रुग्णांना लक्षणे होती. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण हे अतिदक्षता विभागात आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूंपैकी ६ पुरुष तर ३ महिला आहेत. या ९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५ रुग्ण आहेत तर १ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर, एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या २ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप मिळालेली नाही. उर्वरित ७ जणांपैकी ५ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com