प्रकाश आंबेडकर लागलेत विधानसभेच्या तयारीला; EVM विरोधी आंदोलन करणार तीव्र

प्रकाश आंबेडकर लागलेत विधानसभेच्या तयारीला; EVM विरोधी आंदोलन करणार तीव्र

लोकसभा निवडणुकीत बहुतांश उमेदवारांनी लाखांच्या संख्येने मतं मिळवल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आता थेट विधानसभेची तयारी सुरू केलीय. पण तत्पुर्वी ईव्हीएम विरोधातील वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिलेत. त्यासाठी 15 जुलै रोजी आंबेडकर केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. 

एकिकडे ईव्हीएमचा मुद्दा तापत ठेवतानाच वंचित आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची आपली पहिली यादी जाहिर करण्याची घोषणा केलीय. इतर समविचारी पक्षांना सोबत येण्याचं आवाहन करतानाच आंबेडकरांनी स्वबळाचीही तयारी ठेवलीय. 

आगामी विधानसभेत वंचित आघाडीला सोबत घेण्याबाबत काँग्रेस गंभीरपणे विचार करत आहे. मात्र या आघाडीत आपलं स्थान काय असेल असा सवाल आंबेडकरांनी केलाय. शिवाय वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याच्या विधानाबाबतही काँग्रेसने वंचित आघाडीच्या मतदारांची माफी मागावी अशी मागणीही आंबेडकरांनी केलीय.

एकिकडे काँग्रेसच्या आढावा बैठकांमध्ये वंचित आघाडीला सोबत घेण्याचा सूर उमटत असताना, आंबेडकरांनी मात्र आपल्या लेखी काँग्रेस फारशी महत्वाची नसल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलंय. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी काँग्रेस आघाडी आणि वंचित आघाडीचे सूर जुळणार की पुन्हा स्वतंत्रपणे लढण्याचाच मार्ग आंबेडकर अवलंबणार यावर बऱ्याच अंशी विधानसभेची गणितं अवलंबून असणार आहेत.

WebTitle : marathi news maharashtra state assembly election prakash ambedkar oppose to EVM

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com