चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या राजकीय घडामोडी.. वाचा एका क्लिकवर
top maharashtra news

चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या राजकीय घडामोडी.. वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांमधील गावागावात काय घडलंय?
तुमच्या -आमच्या गावागावतली खबरबात घेवूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून..

मुंबई - भाजपच्या संकल्पपत्रातून घोषणांचा पाऊस .. ५ वर्षात १ कोटी रोजगार, २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर, संपूर्ण महाराष्ट्रात इंटरनेटचं जाळं यासह अनेक आश्वासनं...

पुणे - एका लाखाचं बक्षीस असलेल्या वॉन्टेड नक्षलवाद्याला पुण्याच्या चाकणमधून अटक.... 2013 पासून भाकपा माओवादी संघटनेत सक्रिय असल्याची माहिती...

यवतमाळ - देशातील आर्थिक परिस्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी आणि भाजपावर जोरदार घणाघात ... मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलून येतात अशी राहुल गांधींची बोचरी टीका ...

अकलूज -  "शंभर टक्के जागा मिळवणार असा दावा करणाऱ्यांना स्वत:ला तिकीट मिळवता आलं नाही"... राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांवर पवारांची अप्रत्यक्ष टीका ....

मुंबई - शिवसेनेनेकडून गद्दारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता.. तृप्ती सावंतांवर मात्र कोणतीही कारवाईृ नाही... त्यामुळे बंडखोरांचा तिढा आणखी गुंतण्याची शक्यता...

भंडारा - अपक्ष उमेदवार पंकज कारेमोरे यांची प्रचारासाठी अनोखी शक्कल,  लंकापथकच्या माध्यमातून लोकांना आपला जाहिरनामा सांगितला समजावून..

भिवंडी - MIMचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसींचा मोदींवर हल्लाबोल, तिहेरी तलाकविरोधी मुस्लिम समाजाचं खऱ्या अर्थाने भलं करायचं असेल, तर तुम्ही त्यांना आरक्षण द्यावं, असं औवेसींचं आवाहन

मुंबई - विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्य निवडणूक अधिका-यांची माहिती... EVMचा बेकायदेशीरपणे प्रचार केल्यास किंवा अफवा पसरवल्यास कारवाई....

कल्याण - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी उल्हासनगरमध्ये दिव्यांगांची रॅली.... रॅलीमध्ये शासनाच्या निवासी मूकबधीर विद्यालय , निवासी मतिमंद विद्यालय, मतिमंद बालगृहातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी...

रत्नागिरी - चिपळूणमध्ये मतदान जनजागृतीसाठी भव्य दिव्य रांगोळी आणि पथनाट्य.... मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडमूक आयोगाकडून प्रयत्न....

सोलापूर - आय विल वोट म्हणत शपथ घेत अग्निशमन दलाचे जवान मतदान करण्यासाठी सज्ज...... इतर नागरिकांमध्येही मतदानाबद्दल जनजागृती करण्याचा जवानांचा संकल्प ...

रायगड - पोलादपूर तालुक्यातील महादेवाचा मुरा इथल्या ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय..... लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा गावकऱ्यांनी निर्णय.... 

अकोला - दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांकडून लाखो रुपयांचा अवैध देशी दारू साठा जप्त ... पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना घतलं ताब्यात...

नागपूर - दोन कारमधून 96 लाख रुपयांची रोकड जप्त..... निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धडक कारवाई .. 

मुंबई - पीएमसी बँकेच्या दोन खातेधारकांचा मृत्यू.....PMC बँकेत लाखो रुपये  अडकल्याने होते त्रस्त ...

पंढरपूर - विठ्ठल मंदिरातील दान पेटीतून पैसे चोरणारा पुजारी जेरबंद... विठूरायाच्या दान पेटीतून दोन हजार रूपयांची नोट चोरणारा सरकारी पुजारी सीसीटीव्हीत कैद झाल्यानं पुजा-याला अद्दल... 

बुलडाणा - लोणार तालुक्यातील मांडवा योथील दत्तात्रय खंडागळे यांच्या शेतातील सोयाबीनला अज्ञात व्यक्तीने लावली आग.....यात वर्षभराचं संपूर्ण उत्पन्न खाक....

नांदेड - सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेले चार पर्यटक पाण्याच्या प्रवाहात गेले वाहून.... चार पर्यटकांपैकी तिघेजण बेपत्ता तर एकाने धबधब्यातील खडकाला पकडल्याने एकाचा वाचला जीव .... 

मुंबई - मुंबई-पुणे रेल्वे वेळापत्रकात आजपासून बदल... कर्जत आणि मंकी हिल इथं रुळांच्या दुरस्तीचे कामामुळे रेल्वे वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय...

मुंबई - यंदा बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला, तर दहावीची परीक्षा 3 मार्च 2020 ला सुरूवात... परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलंय...

लातूर - उदगीरच्या सौरभ अंबुरे यांना राफेल उडवण्याचा पहिला मान मिळालाय... स्क्वाड्रन लीडर सौरभ अंबुरे यांचं उदगीर हे आजोळ आहे... तर कर्नाटकातील बिदर हे त्यांचं मूळ गाव....राफेल विमान उडवण्याचा पहिला मान अंबुरेना मिळाल्याने उदगीरकरांनी त्यांचं कौतुक केलंय..

Web Title -  Maharashtra Top 36 district news..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com