मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पवारांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पवारांची भेट

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांतच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चिन्हे आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली असता त्यांनी राजभेटीचे सूतोवाच केले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजप-शिवसेनेमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय घेण्याची वेळ आल्यास काय करावे, यासाठी विरोधी गोटातही भेटीगाठींचे सत्र सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीपासून आघाडीच्या बाजूने झुकलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा होण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. कार्यपद्धतीबाबत प्रभावित होऊन शरद पवार यांची भेट घेतल्याचे देशपांडे म्हणाले. या वेळी पवार आणि देशपांडे यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचे समजते. पुढच्या सात-आठ दिवसांत राज ठाकरे हे पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे समजते.

Web Title: MNS Chief Raj Thackeray may be meet NCP chief Sharad Pawar
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com