कार्यकर्त्यांचा हट्ट राज ठाकरेंनी मानला? मनसे लढणार 100 जागांवर?

कार्यकर्त्यांचा हट्ट राज ठाकरेंनी मानला? मनसे लढणार 100 जागांवर?

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीपासून राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना दूर राहणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे राज ठाकरे निवडणूक लढवण्यास सज्ज झालेत. मनसे किमान 100 जागा लढवणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळालीय.

मनसेची मुंबईत महत्त्वाची बैठक झाली, त्या बैठकीत निवडणूक लढवायची झाल्यास किती जागा लढू शकतो, याचा आढावा घेण्यात आला. या जागा प्रामुख्यानं मनसेची ताकत ज्या भागात आहे, तिथल्या आहेत. या जागा आहेत, त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अन्य काही ठिकाणच्या जागांचा समावेश आहे. मनसेची 63 मतदारसंघांत निश्चित ताकत आहे. त्यातल्या किमान 25 मतदारसंघांत निकराची लढाई दिली जाऊ शकते. या मतदारसंघांवर मनसेनं लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय, अशीही माहिती समोर येतेय.


या उमेदवारांची नावं चर्चेत : 

  • आदित्य शिरोडकर - शिवडी
  • नितीन सरदेसाई - माहीम
  • अभिजीत पानसे - ठाणे मतदार संघ  
  • नितीन नांदगावकर - विक्रोळी
  • संतोष धुरी - वरळी
  • अविनाश जाधव - कोपरी, पाचपाखाडी - ठाणे 
  • संजय तुर्डे - कलिना
  • राजू पाटील- कल्याण ग्रामीण

यांच्यासह सुमारे 34 ते 35 उमेदवारांना पहिल्या यादीत उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय..

सध्या तरी मनसे एकला चलो रे च्याच भूमिकेत आहे..मात्र, मनसेनं निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याचं ठरवल्यास ही निवडणूक चांगलीच चुरशीची होईल, हे नक्की.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com