धोनीची भारतीय संघातून होणार हकालपट्टी ?

धोनीची भारतीय संघातून होणार हकालपट्टी ?

नवी दिल्ली : विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार अशी चर्चा सुरु होती. पण, धोनीने अद्याप निवृत्ती न घेतल्याने आता त्याची संघातून हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे.

भारताला 2011 मध्ये विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या धोनीचा खेळ कमालीचा संथ झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही त्याच्या खेळामुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. काही जणांना धोनीला भारताच्या पराभवाला जबाबदार धरले आहे. धोनी या सामन्यानंतर निवृत्त होईल, अशी चर्चा होती. पण, धोनीने अद्याप निवृत्तीबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. 

भारतीय संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यापूर्वी त्याची संघातून हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद लवकरच धोनीसोबत त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा करणार आहेत. तसेच त्यांनी नुकतेच लवकरच धोनीला संघाबाहेर करण्यात येईल याचे संकेत दिले होते. रिषभ पंतसारखे अनेक युवा खेळाडू संघातील जागेबाबत आशावादी आहेत. त्यामुळे धोनीवर कुऱ्हाड कोसळणार हे नक्की आहे.

WebTitle : marathi news ms dhoni to be expelled from the team india says sources 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com