चेन्नई सुपर किंग्जने धोनीबाबत घेतला मोठा निर्णय

चेन्नई सुपर किंग्जने धोनीबाबत घेतला मोठा निर्णय

चेन्नई : "जगज्जेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी यापुढे भारताकडून खेळो अथवा ना खेळो, यंदा तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळेल. पुढील वर्षी त्याचे नाव लिलावात असेल. आम्ही त्याला आमच्याकडेच राखू,' असे सूचक वक्तव्य संघटक एन. श्रीनिवासन यांनी केले. 

चेन्नई सुपर किंग्जची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्‌स कंपनीचे ते उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. स्वतः धोनीची या कंपनीत उपाध्यक्ष (मार्केटिंग) या उच्च पदावर नियुक्ती झाली आहे. या कंपनीच्या एका खास कार्यक्रमात श्रीनिवासन म्हणाले, की "धोनी केव्हा (निवृत्त होणार)... आणखी किती काळ खेळणार... आदी चर्चा लोक करीत राहतात. तो खेळेल. मी तुम्हाला खात्री देतो, तो यंदा खेळेल. पुढील वर्षी तो लिलावात जाईल, आम्ही त्याला कायम ठेवू, त्यामुळे कुणाच्याही मनात शंका नाही.' 
गतवर्षी विश्‍वकरंडक उपांत्य फेरीपासून धोनी खेळलेला नाही. त्याने संघनिवडीसाठी उपलब्ध असल्याचे अद्याप जाहीर केलेले नाही.

"बीसीसीआय'ने जाहीर केलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीतही त्याला स्थान मिळाले नाही, त्यामुळे त्याच्या कारकिर्दीच्या भवितव्यावरून बरीच चर्चा सुरू आहे. टी20 विश्‍वकरंडकाद्वारे तो देदीप्यमान कारकिर्दीची सांगता करण्याची अपेक्षा आहे. "टीम इंडिया'चे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अलीकडेच सांगितले, की "आयपीएल'मध्ये चांगली कामगिरी केली तर धोनी राष्ट्रीय संघातील स्थानासाठी पुन्हा शर्यतीत येईल. "आयपीएल'मध्ये तो ताजातवाना होऊन खेळेल. त्याच्या मनातील कल्पना सुस्पष्ट असतील. तेव्हा त्याचा फॉर्म तुम्हाला पाहावा लागेल. त्याने चमकदार कामगिरी केली आणि आपण निवडीसाठी उपलब्ध असल्याचे जाहीर केले तर तुम्ही अकारण चर्चा करून चालणार नाही. 

ऋणानुबंध : धोनी अन्‌ चेन्नई! 
धोनी 38 वर्षांचा आहे. त्याचे आणि चेन्नई सुपर किंग्जचे अनोखे नाते आहे. 2008 मध्ये आयपीएलला प्रारंभ झाल्यापासून धोनी कर्णधार आहे. 2016 व 2017 अशा दोन मोसमांत स्पॉट-फिक्‍सिंगमुळे या फ्रॅंचायजीवर बंदी आली तेव्हा धोनी रायझिंग पुणे सुपर जायंट्‌स संघाकडे होता; पण तेथे तो रमला नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा आयपील जेतेपद व पाच वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. याशिवाय 2010 आणि 2014 अशा दोन मोसमांत हा संघ चॅंपियन्स लीग विजेताही ठरला.

Web Title ms dhoni will be retained chennai super kings 2021 too says n srinivasan

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com