साडीवर चक्क करिनाचे नाव...

 साडीवर चक्क करिनाचे नाव...

बेबो करिना कपूर खान ही बॉलिवुड स्टाईल आयकॉनपैकी एक आहे. म्हणजे बिकनीपासून ते साडीपर्यंत प्रत्येक आउटफीटमध्ये ती कॉन्फिडन्ट दिसते. प्रेग्नंसीनंतरही करिनाने स्वत:ला फीट ठेवलं आणि त्यानंतरही करिनाचे ग्लॅमरस लुक चर्चेत राहिले.


करिना कपूर खान सध्या गुड न्यूज या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान करिनाचे एकापेक्षा एक हटके लूक आणि पेहराव पाहायला मिळत आहेत. नुकताच करिनाचा ब्लेजर फॉर्मल लुकही व्हायरल झाला. 


सोशल मिडीयावर करिनाचे काही फोटो सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये करिनाने साडी नेसली आहे. पिंक कलरच्या या साडीमध्ये बेबो तर नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. मात्र या साडीचं एक वैशिष्ट्य सगळ्यांचं लक्ष वेधत आहेत.

ती गोष्टी म्हणजे या साडीची डिझाईन. या साडीवर चक्क करिनाचं नाव डिझाईन केलेलं पाहायला मिळत आहे. करिनाला इंडस्ट्रीमध्येही बेबो असं नाव आहे. आणि हेच नाव या साडीवर पाहायला मिळतय. उर्वशी सेठी नावाच्या डिझाईनरच्या पिचीका ब्रँडचीही साडी आहे. या साडीतील बेबोचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Web Title : Kareena Kapoor Name On New designer Saari

Related Stories

No stories found.