ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार, नाना पटोलेंची आयोगाकडे तक्रार

ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार, नाना पटोलेंची आयोगाकडे तक्रार

मुंबई - लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आला असून, निवडणूक अधिकाऱ्यांनीही पक्षपाती भूमिका घेतल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्‍तांकडे केली आहे.  

नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका पक्षपातीपणाची होती. त्यांनी नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविली नाही, असा थेट आरोप पटोले यांनी तक्रारीत केला आहे. पटोलेंच्या तक्रारीनुसार, सुरवातीला स्ट्राँग रूममधील कॅमेरे तीन दिवसांपासून बंद होते. तक्रारीनंतर  कॅमेरे सुरू आहेत. फक्त मॉनिटर बंद असल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करून या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले.

Web Title: Nana Patole Complaint to Commission for EVM

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com