मुंबईतील आयआयटीमधील विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकऱ्या

 मुंबईतील आयआयटीमधील विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकऱ्या

मुंबई - आयआयटी मुंबईतील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये उच्च वेतनाच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. या प्रक्रियेत १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या; काही जणांना तर तब्बल ३२.४ लाखांचे वार्षिक ‘पॅकेज’ मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत वेतनात भरघोस वाढ झाली आहे.

आयआयटीमधील व्यवस्थापन शाखेच्या ११२ पदवीधरांना नोकऱ्या मिळाल्या. त्यांना सरासरी २० लाखांपासून पुढे वार्षिक वेतन मिळणार आहे. गतवर्षी सरासरी १९.०६ लाखांचे ‘पॅकेज’ मिळाले होते. ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन, जीईपी कन्सल्टिंग, नेस्ले, पी. अँड जी., गुगल, लॉरिअल, येस बॅंक, झूमकार, कोलगेट, ईवाय आदी ३८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एचडीएफसी, ओयो, एचएसबीसी, टाटा ग्लोबल बिव्हरेज या कंपन्या प्रथमच सहभागी झाल्या होत्या.

Web Title: 100% of jobs from 'Campus Placement' for Mehta School of Management

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com