अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक, बिग बींच्या प्रोफाईलवर इम्रान खानचा फोटो

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक, बिग बींच्या प्रोफाईलवर इम्रान खानचा फोटो

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट सोमवारी रात्री हॅक करण्यात आले होते. लव्ह पाकिस्तान असा संदेश लिहून हे अकाउंट हॅक करण्यात आले होते. 

सोमवारी (ता. 10) रात्री उशिरा अमिताभ यांच्या ट्विटर अकाउंटवरील त्यांच्या फोटोच्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. तसेच 'आय लव्ह पाकिस्तान,' असे ट्‌विट केल्याचे दिसते. 'टर्किश' हॅकर्सनी बच्चन यांचे अकाउंट हॅक केल्याची माहिती पुढे आली आहे.

बॉलिवूड महानायक अमिताभ यांचे अकाउंट हॅक झाल्याने पोलिसांनीही तपास सुरु केला. पाकिस्तानी समर्थक असलेल्या टर्किश हॅकर्सच्या ग्रुपने हे अकाउंट हॅक केले होते. आईलडिझ टीम असे या ग्रुपचे नाव असून, त्यांनी याला सायबर आर्मी असे नावही दिले होते. या ग्रुपने केलेल्या ट्विटसोबत तुर्की आणि पाकिस्तानचे  झेंडेही टाकण्यात आले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा त्यांचे अकाउंट पूर्ववत झाले. हॅकर्सने टाकलेले ट्विट आता दिसत नाहीत.

या हॅकर्सच्या ग्रुपने सुरवातीला आईसलँड रिपब्लिकला इशारा देत म्हटले की, तुर्कीच्या फुटबॉलपटूंबद्दल पक्षपातीपणा केल्याने आम्ही याची कठोर निंदा करत आहोत. आम्ही प्रेमानेच बोलतो, पण आमच्याकडेही मोठी साधने आहेत. तुम्हाला सांगायचे आहे, की हा सायबर अॅटॅक आहे. 

Web Title: Amitabh Bachchans Twitter account hacked

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com