वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला आणखी ९७० जागा

वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला आणखी ९७० जागा

मुंबई : वैद्यकीय शाखेतून पदवी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमासाठीच्या जागांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ९७० नव्या जागा आल्या आहेत. राज्यातील २० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या जागा वाटल्या जाणार आहेत. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शाखेला प्रवेश मिळेल. 'हिंदूस्थान टाइम्स'ने हे वृत्त दिले आहे.

केंद्र सरकारने आर्थिक गरिबांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १० टक्के आरक्षण लागू करण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढविण्याची गरज होती. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला. उपलब्ध जागांपेक्षा खूप अधिक प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतील, तर विशेष परिस्थितीत सरकार जागा वाढविण्याचा निर्णय घेते. त्याचप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी नव्याने दाखल झालेल्या जागांचा विचार करून त्यानंतर विविध आरक्षणासाठी किती जागा असतील, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

Web Title : Another 9 70 seats in Maharashtra for medical admission

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com