भाजपच्या नाराज नेत्यांचं भेटीचं सत्र सुरुच...

भाजपच्या नाराज नेत्यांचं भेटीचं सत्र सुरुच...
Prakash Mehta, Pankaja munde

भाजप नेते प्रकाश मेहता हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेलेत. भाजपमधल्या नाराजांमध्ये भेटीगाठी होतायत. रॉयल स्टोन या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे यांची भेट झालीये. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज आहेत अशा चर्चा आहेत. त्यातच आज प्रकाश मेहता यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतलीये. 

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याचा एक सूर पाहायला मिळतोय. अशात अनेक भाजप नेते पंकजा मुंडे यांची भेट घेताना पाहायला मिळतायत. यापूर्वी एकनाथ खडसे, विनोद तावडे या भाजप नेत्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. पंकजा मुंडे भाजप सोडून कुठे जाणार नाहीत, अशा प्रतिक्रिया देखील भाजप नेत्यांकडून आल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान आज झालेली भेट ही वैय्यक्तिक असल्याची माहिती समोर येतेय. स्वतः प्रकाश मेहतांनी, आजची भेट बैयाक्क्तिक असल्याची माहिती दिलीये.  दरम्यान खरंच पंकजा मुंडे नाराज आहेत का? याची चाचपणी करण्यासाठी प्रकाश मेहता यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली असू शकते, असं राजकीय विश्लेषक सांगतायत. प्रकाश मेहता यांना विधानसभेत तिकीट मिळालं नव्हतं, अशात खुद्द प्रकाश मेहता हे देखील पक्षात नाराज आहेत का ? या चर्चांना देखील उधाण आलंय.    

पंकजा मुंडे यांचा मराठवाडा दौरा रद्द : 
दरम्यान पंकजा मुंडे यांनी त्यांचा नियोजित मराठवाडा दौरा रद्द केलाय. मराठवाड्यात पंकजा मुंडे या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होत्या. मात्र तब्येत बरी नसल्याने पंकजा मुंडे यांनी आपला मराठवाडा दौरा आता रद्द केलाय. 

WebTitle : BJP Leader Prakash Mehta Met Pankaja munde 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com