1 हजाराची साडी खरेदी करा... कांदे FREE न्या

1 हजाराची साडी खरेदी करा... कांदे FREE न्या

मुंबई : कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडलेत. कांद्याच्या दरवाढीमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नागरिक पुरते हैराण झालेत. कांद्याने यावेळी लोकांच्या डोळ्यातून चांगलंच पाणी काढलंय. कांदा एवढा महाग झाला की याचे पडसाद थेट संसदेत देखील उमटल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर तर कांदा हिरो ठरला. कांद्याबाबातीत रोज नवनवे मेम्स, रोज नवनवे व्हिडीओ आपण पाहतोय. 

अशातच बातमी एका हॅडलूम विक्रेत्याची. या विक्रेत्याने एक भन्नाट युक्ती केलीये. इथे येणाऱ्या ग्राहकांना हा विक्रेता चक्क कांदे फ्री देतोय. हा दुकानदार आहे मुंबईनजीकच्या उल्हासनगरमधला. कांद्याच्या दरवाढीमुळं सर्वसामान्य हैराण झालेले असताना उल्हासनगरमधील या दुकानदारानं अफलातून आयडीयाची कल्पना लढवली आहे. हँडलूम खरेदीवर एक किलो कांदे मोफत देण्याची स्कीम दुकानदारानं सुरु केलीय, या योजनेचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली. 

सध्या हँडलूम व्यवसायावर मंदीचं सावट आहे. म्हणूनच या उल्हासनगरमधील शीतल हँडलूम या दुकानदाराने हा अनोखा फंडा आजमावला आहे. याठिकाणी तुम्ही जर हजार रुपयांची खरेदी केली तर, तुम्हाला एक किलो कांदे फ्री देण्यात येतायत. सध्या कांद्याचे भाव 100 ते 120 रुपये आहेत. अशात ग्राहक देखील शंभर रुपयांचे कांदे फ्री मिळत असल्याने चांगलेच सुखावलेत.     
 
Web title : Buy 1 Thousand Rupees Saari And Take Free Onion

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com