VIDEO | पगाराची तारीख एकच! देशभरात होणार एकाच दिवशी पगार ?

VIDEO | पगाराची तारीख एकच! देशभरात होणार एकाच दिवशी पगार ?

पगाराचा दिवस म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचा महिन्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस. त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. असं अनेकदा होतं, तुमचा पगार संपला की तुम्ही तुमच्या मित्रांकडून किंवा आई बाबांकडून महिन्याच्या शेवटी थोडे फार पैसे घेतात. माझा पगार झाला ली लगेच परत करतो असंही तुम्ही सांगता. पण आता तुमचा आणि तुमच्या मित्रांचा पगार एकाच दिवशी होणार हे तुम्हाला आम्ही सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ? पगाराचा दिवस, त्याचा आनंद एकत्र साजरा केला तर..

देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पगाराची तारीख वेगवेगळी आहे. कुठे महिन्याच्या शेवटच्या किंवा पहिल्या दिवशी पगार होतो. कुठे सात तारखेला कुठे 10 तारखेला तर कुठे महिन्याच्या अखेरीस 25 तारखेला पगार होतो. काहीजणांना तर महिन्यातून चक्क दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा तुकड्यातुकड्यात पगार मिळतो. मात्र, आता हे चित्र बदलणाराय. आता सगळ्यांनाच एका ठरलेल्या तारखेला पगार मिळेल. पूर्ण देशभर त्याची अंमलबजावणी होईल.


सर्व क्षेत्रांतल्या कामगारांना किमान समान वेतन कार्यक्रम लागू करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वन नेशन, वन पे डे या सूत्रावर सरकारचं काम सुरू आहे. आता त्याला उद्योग, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Web Title: central government asked to work on one nation one pay day

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com