मतदारांसोबत मॉर्निंग वॉक करुन मुख्यमंत्र्यांना काय फायदा होणार? 

मतदारांसोबत मॉर्निंग वॉक करुन मुख्यमंत्र्यांना काय फायदा होणार? 

मुंबई : मॉर्निंग वॉकचे करणं आरोग्यासाठी तसं फायदेशीरच. पण हेच मॉर्निंग वॉक राजकारणातही फायदेशीर असतं, असं कुणी म्हटलं, तर त्याला वेड्यात काढलं जाईल.  मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला अपवाद आहेत. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत मॉर्निंग वॉक केला. पण तो चांगल्या आरोग्यासाठी केला की चांगल्या राजकारणासाठी, याची चर्चा रंगतेय. 

रविवारचा दिवस उजाडला तो मुख्यमंत्र्याच्या अनोख्या प्रचार फंड्याने. मुख्यमंत्री सकाळ सकाळी थेट नरीमन पॉईन्टवर अवतरले. 
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचीही गर्दी होती. नेहमी नेत्याच्या पेहरावाता दिसणारे मुख्यमंत्री यावेळी चक्क
टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टमध्ये दिसले. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही या मॉर्निंग वॉकमध्ये दिसले. तसं पाहिलं तर गोव्याची हवा ही मुंबईच्या 
हवेपेक्षा जास्त चांगली आहे. कारण मुंबईतली लोकं चांगल्या निसर्ग पाहायचा म्हटला की गोव्यातच जातात. अशातच गोव्याचे मुख्यमंत्री चक्क मुंबईत मॉर्निंग वॉक करण्यासाठी आल्याने अनेकांच्या भुवया उंचवाल्यात. 

मुख्यमंत्री आले. आजूबाजूला कार्यकर्त्यांचा गराडा होता. काही प्रमाणात ते लोकांशीही बोलले. नरीमन पॉईन्टच्या फूटपाथवर काही काळ चालत
मुख्यमंत्र्यांनी मतदारांना भेटण्याचा प्रयत्न केला.  मतदारांना भेटण्याचा हा प्रयत्न मुख्मयंत्र्यांनी निवडणुकीत किती फायदेशीर ठरतो हे महत्त्वाचंय. मात्र अशात गोव्याचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्राच्या प्रचारासाठी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला धावून का बुआ आले, याचा अभ्यास आता राजकीय विश्लेषक करत आहे. 

Web Title : CM Devendra Fadnavis morning walk in Mumbai

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com