Monsoon | मुंबईत पडला अवकाळी पाऊस...

Monsoon | मुंबईत पडला अवकाळी पाऊस...

मुंबईत चक्क नाताळात पाऊस पडताना पाहायला मिळतोय. मुंबईतील पडणारा पाऊस अवकाळी पाऊस आहे. नैऋत्य आणि दक्षिणपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळेच मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस अनुभवायला मिळतोय. 

आज मुंबईत पडलेल्या पावसावर नेटीझन्सन काय म्हणतायत पाहा:  

स्कायमेट संस्थेमार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत हा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मुंबई शहरात मुसळधार पाऊस पडणार नाही असं देखील स्कायमेटने म्हटलंय. त्यामुळे आता मुंबईत पडणारा पाऊस हलक्या स्वरूपाचा असणार आहे. 

कुठे पडला पाऊस ? 

मुंबई आणि उपनगरामध्ये म्हणजेच ठाणे, डोंबिवली, पनवेल, ओशिवरा, जोगेश्वरी पश्चिम, मालाड , घाटकोपर, विक्रोळी, ऐरोली, कांदिवली आणि विलेपार्लेमध्ये पावसाच्या सरी अनुभवायला मिळाल्या. 

सध्या वातावरणात कमालीचा फरक पडलेला पाहायला मिळतोय. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला अशा आजारांचं प्रमाण वाढतं.  हिवाळ्यात उष्णता आणि आज पडलेला पाऊस, यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय.  

WebTitle : drizzles in mumbai netizens surprised with the un seasonal rain

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com