फ्लॅटधारकांसाठी मोठी खुशखबर! सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय

फ्लॅटधारकांसाठी मोठी खुशखबर! सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय

तुम्ही फ्लॅटधारक असाल तर आता तुमची फ्लॅटवरची मालकी आणखी मजबूत होणार आहे. कारण आता गृहनिर्माण सोसायट्या आणि फ्लॅटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. त्यामुळे मालमत्तेच्या मालकी हक्काचा वाद निर्माण झाल्यास कायदेशीर पेच निर्माण होणार नाही. सोसायट्यांसह प्रत्येक फ्लॅटधारकाला पुरवणी कार्ड देण्यात येणार आहे.

यापूर्वी प्रत्येक सर्व्हे नंबरला एकच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत होतं. एखादा सर्व्हे नंबर दहा एकराचा असेल तर त्याचं प्रॉपर्टी कार्ड एकच असायचं. जमिनीच्या मालकीबाबत वाद झाल्यास फ्लॅटधारकाला फटका बसायचा. मालमत्तेच्या मालकी हक्काचा कायदेशीर पेच निर्माण व्हायचा. प्रत्येक फ्लॅटधारकाची स्वतंत्र नोंद झाल्यास फ्लॅटधारकाला संरक्षण मिळणार आहे.

गेल्या काही वर्षात मुंबई-पुण्यासह शहरांमध्ये फ्लॅटधारकांची संख्या प्रचंड वाढलीय. त्यात फसवणुकीचे प्रकारही घडतायंत. त्यांना पुरवणी प्रॉपर्टी कार्डमुळे आळा बसेल हे नक्की.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com