"जिथून कर्नाटक सरकार कोसळले तिथूनच महाराष्ट्राचे सरकार बनवू"

"जिथून कर्नाटक सरकार कोसळले तिथूनच महाराष्ट्राचे सरकार बनवू"
NCP , BJP

मुंबई : महाराष्ट्रात चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे काही नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हे मुंबईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाने कर्नाटकचे काँग्रेस-जेडीएस सरकारमधील बंडखोर आमदारांना ठेवले होते. त्यानंतर या आमदारांच्या जिवावर कर्नाटक सरकार पाडण्यात भाजपला यश आले होते. त्याच पद्धतीने सध्या स्थापन झालेले महाराष्ट्र सरकारही कोसळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनीही ट्विट करून तसे संकेत दिले आहेत. मलिक यांनी म्हटले की, भाजपने या हॉटेलमधून कर्नाटक सरकार पाडले होते. त्याच पद्धतीने आम्हीही याच हॉटेलमधून महाराष्ट्रातील भाजप सरकार पाडून आमचे सरकार स्थापन करू. एक प्रकारे नवाब मलिक यांनी या हॉटेलचा संदर्भ देत भाजप सरकारला इशाराच दिला आहे.


सध्या अस्तित्वात असलेले महाराष्ट्र सरकार खरंच कोसळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, काल (ता.23) भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केले असल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी तसे स्पष्ट केले की भाजपला समर्थन हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे. हा पक्षाचा निर्णय नाही. त्यानंतर राष्ट्रावादीच्या सर्व आमदारांना रेनेसॉं हॉटेलला हलविण्यात आले होते.


दरम्यान, कुमारस्वामीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस सरकार भाजपने पाडले होते. काँग्रेस-जेडीएसचे 13 बंडखोर आमदार भाजपने मुंबईतील याच रेनेसॉं हॉटेलमध्ये निगराणीखाली ठेवले होते. त्यावेळी कर्नाटक काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे हॉटेला आमदारांना भेटण्यासाठी दाखल झाले होते. परंतु, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना बंडखोर कर्नाटक आमदारांसोबतची भेट नाकारली होती.


Web Title: hotel renaissance again in limelight this time for maharashtra government formation

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com