मुंबईतील घरे महागणार

मुंबईतील घरे महागणार

मुंबई - राज्य सरकारने मुंबई महापालिका क्षेत्रात मुद्रांक शुल्कात एक टक्का अधिभार लागू केला आहे. त्यामुळे स्थावर मालमत्तांची खरेदी-विक्री, बक्षिसपत्र, तारण; तसेच हस्तांतरण करताना संबंधितांना सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागेल. परिणामी, शहरात घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांचा खिसा आणखी हलका होणार आहे. मुंबईतील पायाभूत प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी ८ फेब्रुवारीपासून सरकारने हा अधिभार लागू केला आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक चर्चेविना मंजूर झाले होते. विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर सरकारने त्याबाबतची अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार मुंबईत घर खरेदी करताना  रेडीरेकनर दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्कासह एक टक्का अतिरिक्त अधिभार भरावे लागेल.

Web Title: home prices in Mumbai will rise

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com