ईद आणि स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान दहशतवाद्यांचा मोठा घातपात घडविण्याचा कट?

ईद आणि स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान दहशतवाद्यांचा मोठा घातपात घडविण्याचा कट?

मुंबई : ईद आणि स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान मोठा घातपात घडवण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला असल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 

पाकिस्तानमधल्या इस्लामीक स्टेटच्या दहशतवाद्यांना मोठा घातपात घडवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी मुंबई, दिल्लीसह देशातील १५ शहरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. भारतात मोठा विध्वंसक हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना पाचरण केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यावरून हाय अलर्ट देण्यात आला आहे.

नौदलासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला असून भारतीय नौदल कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना दहशतवाद्यांना समुद्री मार्गे भारतात हल्ला घडविण्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती आहे.

Web Title: Intelligence reports say terrorists a major massacre between Eid and Independence Day
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com