VIDEO | महाशिवआघाडी सत्तेत येणार

VIDEO | महाशिवआघाडी सत्तेत येणार
Sonia Gandhi , Sharad Pawar , Uddhav Thackeray , Shivsena , NCP ,

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातील दोन विरोधी टोके एक म्हणजे ठाकरे आणि दुसरे पवार हे आज सत्तेत एकत्र आल्याचे दिसून आले. याला पाठिंबा मिळाला तो काँग्रेसच्या हाताचा. यामुळे महाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. गेल्या काही दिवसांतील राजकीय नाट्यानंतर आज, सायंकाळी सहाच्या सुमारास काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली. तत्पूर्वीच, शिवसेनेचे नेते राज्यपालांच्या भेटीला रवाना झाले होते. त्यामुळं राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे नवे राजकीय समीकरण उदयास आल्याचे स्पष्ट झाले.

पवार-ठाकरे चर्चा 
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला अन् याचा शेवट आज पाहायला मिळाला. भाजपने सर्वाधिक 105 जागा असूनही पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी दिली होती. शिवसेनेने आज आपले बहुमत सिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बरोबर घेतले आहे. आज, दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सुमारे 50 मिनिटे उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. त्यानंतर या महाशिवआघाडीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर दिल्लीतून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही त्याला होकार दिल्याने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत.


सोनियांन घेतली आमदारांची मते
भाजपला सत्तेबाहेर ठेवणे आणि राज्यातील जनतेचे हित पाहून शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस, अशी नवी आघाडी समोर आली आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री पदावरचा दावा कायम ठेवल्याने भाजप सोबतची युती फिस्कटली. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसने सहमतीचे संकेत दिले. त्यामुळे आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार हे स्पष्ट झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्यक्ष सत्तेत जाणार असले तरी काँग्रेस मात्र सत्तेत सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देईल असे सांगण्यात येत होते. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षश्रेष्ठीवर दबाव टाकत आज सोनिया गांधींची भेट घेतली. या वेळी सोनिया गांधीनी प्रत्यक्ष आमदारांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आणि त्यानंतरच शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली.


शरद पवार यांच्याशी शिवसेनेचे नेते संजय राऊत सतत संपर्कात होते. आजही त्यांनी त्यांची भेट घेतली होती. जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याचे पवार म्हणत असले तरी, भाजप शिवसेनेनं सत्ता स्थापन केली नाही तर, पर्यायी सरकार राज्याला देण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखविल्याने आज पुन्हा एकदा राष्ट्रपती सत्तेत आली आहे. 

पक्षिय बलाबल 

शिवसेना 56 
राष्ट्रवादी 54 
काँग्रेस 45 
अपक्ष व इतर 10 
एकूण : 164

Web Title: maharashtra political updates shiv sena ncp to form government with congress

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com