महाराष्ट्राच्या नवीन सरकारवर मराठा संघटना का आहेत नाराज...

महाराष्ट्राच्या नवीन सरकारवर मराठा संघटना का आहेत नाराज...
Uddhav Thackeray, Maratha Reservation Maratha organizations

राज्य सरकारकडे पैसे नसल्यामुळे मराठा आरक्षण केस चालवणा-या मुकूल रोहतगी यांना महाराष्ट्र सरकारने हटवल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी बाजू मांडणारे रोहतगी हे महागडे वकील असल्याचं कारण सरकारनं दिल्याचं समजतंय. त्यावरून मराठा समाजात नाराजी आहे. 

खासदार छत्रपती संभाजीराजेंनीसुद्धा याबाबतची नाराजी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवलीय. त्यामुळे सरकारने या मुद्द्यावर खुलासा केलाय. 
मात्र सरकारने नियुक्त केलेल्या महागड्या वकिलांचा युक्तिवादादरम्यान फारसा फायदा होत नसल्याचाही एक सूर आहे. त्यामुळे मराठा संघटनांनी फक्त सरकारी वकिलांवर अवलंबून न राहता सर्वोच्च न्यायालयात मराठी संघटनांची बाजू मांडण्यासाठी खासगी वकिलसुद्धा दिलेत. 

मराठा समाजाची राज्यातली लोकसंख्या पाहता राजकीयदृष्ट्या या समाजाला दुखावणं कोणत्याच राजकीय पक्षाला तुर्तास परवडणारं नाही. त्यामुळेच महागडे वकिल जरी या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या अपेक्षेनुसार प्रभावी युक्तिवाद करत नसले तरीही त्यांना हटवण्याचा निर्णय सरकार घेणार नाही, एवढं निश्चित.

Web Title: Maratha organizations angry On new government of Maharashtra

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com