मुंबईच्या महापौरांचीच गाडी 'नो पार्किंग'मध्ये पार्क; हे पाहिल्यावर मुंबईकर नियम पाळतील का?

मुंबईच्या महापौरांचीच गाडी 'नो पार्किंग'मध्ये पार्क; हे पाहिल्यावर मुंबईकर नियम पाळतील का?

मुंबईत नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करणाऱ्या वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला जात आहे. महापालिकेच्या या मोहिमेला मुंबईकरांनीही साथ दिली आहे. असं असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिकेचे नियम धाब्यावर बसवत चक्क नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केल्याचं उघड झालं आहे.

धक्कादायक म्हणजे पालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा करत महापौरांना दंड ठोठावला नसून त्यांच्याविरोधात कारवाईही केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे येत्या महापालिका सभागृहात हा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे असून या मुद्द्यावरून विरोधक महापौरांना धारेवर धरण्याची चिन्हे आहेत.

WebTitle : marathi news mumbai mayor mahadeshwars vehicle is parked in no parking 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com