राज ठाकरे व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये काय म्हणाले? पाहा

राज ठाकरे व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये काय म्हणाले? पाहा

मुंबई : राज ठाकरे हे कायम आपल्या प्रेझेंटेशनच्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. याचा प्रत्यय आपल्याला लोकसभा निवडणुकांच्या वेळेस आलाय. यानंतर राज ठाकरे निवडणुका लढवणार का इथून सगळे प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आपले तरुण तडफदार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. अशातच राज ठाकरे आता विधानसभेसाठी प्रचारासाठी काय फंडा वापरतात यावर सगळ्याचं लक्ष होतं. 

राज ठाकरे पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ' सारखं यावेळेस काय करतात यावर तर प्रत्येकाचं लक्ष होतं. राज ठाकरे यांचा प्रचाराचा झंझावात तर सुरूच आहेत. पण वेगळं असं राज ठाकरे काय करतायत याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.

दरम्यान, राज ठाकरे यानी आता सोशल मिडियाच्या माध्यमातून आता एक ऑडियो क्लिप  शेअर करून मतदारांना साद घातलीये. राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर, यु-ट्यूबवरून आपली ऑडियो क्लिप शेअर किलीये.

काय आहे 'ऑडियो क्लिप'मध्ये 
मनसेला सक्षम विरोधी पक्ष बनवा असं आवाहन राज ठाकरे यांनी सर्व मतदारांना केलंय. दरम्यान, आपण ज्यासाठी 2014 मध्ये वेगळ्या सरकारला निवडून आणलं ते सरकारने आधीपेक्षा जास्त नुकसान केलंय. त्यामुळे आताची वेळ, आताची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे, गाफिल राहू नका असा सावध इशारा देतानाच, तुमचा आवाज विधानसभेत पाठवायची हीच वेळ आहे, असं राज ठाकरे म्हणालेत. 

प्रचार सभांचा धडाका राज ठाकरे यांनी लावलाय. विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज ठाकरे यांनी एक वेगळी मागणी घेत, एक वेगळा नारा देत मतदारांना साद घातली आहे. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. त्यामुळे आता, मतदार राजा राज ठाकरेना विरोधी बाकावर बसवतोय का ? हे पहावं लागेल.

Web Title: MNS president Raj Thackerays Viral Audio clip

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com