Chandrayaan 2 | विक्रम लँडर सापडला...

Chandrayaan 2 | विक्रम लँडर सापडला...
Chandrayaan2 , Vikram Lander

नवी दिल्ली : इस्रोच्या महत्वाकांक्षी 'चांद्रयान 2'बद्दल अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने म्हणजेच नासाने मोठा शोध लावला. चांद्रयानाच्या विक्रम लँडरचे (Vikram Lander) तुकडे सापडल्याची माहिती नासाने ट्विटरवरून दिली आहे. नासाच्या 'Nasa Moon' या त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ही माहिती दिली. या अकाऊंटवर विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही.

नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरने विक्रम लँडरचे हे फोटो टिपले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेले हे फोटो साधारण एक किलोमीटरच्या अंतरावरून काढलेले आहेत. विक्रम लँडरच्या चंद्रावर ज्या ठिकाणी लँडींग होणार होते, तिथपासून 750 मीटर अंतरावर नासाला हे तुकडे सापडले आहेत. या फोटोत विक्रमचे तीन तुकडे दिसत आहेत. ते साधारण 2*2 पिक्सलचे असल्याची शक्यता आहे. 

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाल्याने त्याचा पृष्ठभागावरील परिणाम या फोटोंमध्ये दिसून येत आहे. या परिणाम झालेल्या भागाला 'Impact Site' असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने याबाबतची सविस्तर माहिती नासाकडे मागितली आहे. या फोटोबद्दल नासा एक अहवाल इस्रोला देणार असून, पुढील संशोधन त्याप्रमाणे करण्यात येईल. विक्रमची माहिती मिळण्याची शक्याता यापूर्वीच नासाने वर्तवली होती. 

असे भरकटले होते 'चांद्रयान 2'
'चांद्रायन 2'मधील 'विक्रम' लॅंडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात 'मॅंझिनस सी' आणि 'सिंपेलिअस एन' या दोन विवरांच्यामध्ये उतरविण्यात येणार होते. चंद्राच्या 67 अक्षांशाच्या जवळ उतरविण्यासाठी विषुववृत्ताशी अचूक 90 अंशांचा कोन करणारी कक्षा मिळणे आवश्‍यक होते. चांद्रभूमीपासून 30 किलोमीटर अंतरावर असताना पहाटे 1 वाजून 38 मिनिटांनी विक्रम लँडर उतरविण्याची प्रक्रिया सुरू झाली. यासाठीच्या आज्ञावली बंगळूरच्या इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कमधून देण्यात आल्या. 'विक्रम'चा वेग कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एक वाजून 48 मिनिटांनी विक्रम चंद्रापासून केवळ 7.4 किलोमीटर अंतरावर होता. त्यानंतर त्याच्या दिशादर्शक यंत्रणांच्या साह्याने जागेची निश्‍चितीही करण्यात आली होती. मात्र चांद्रभूमीपासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लॅंडरचा पृथ्वीवरील केंद्राशी असलेला संपर्क तुटला. नियोजित वेळेनंतही तो प्रस्थापित होऊ शकला नाही. त्यामुळे भारताचे चांद्रभूमीवर सुखरूप उतरण्याचे स्वप्न भंग पावले. 

Web Title: Nasa founds Chandrayaan 2 Vikram lander and tweets pic of impact site

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com