भाजपचे 'हे' आमदार भाजपला देणार सोडचिठ्ठी ?

भाजपचे 'हे' आमदार भाजपला देणार सोडचिठ्ठी ?
BJP

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या गोटात सहभागी झालेले, परंतु आता सत्तेबाहेर राहावे लागल्यामुळे पश्चाताप होत असलेले भाजप आमदार परतीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. याबातचे वृत्तही काही इंग्रजी संकेतस्थळांनी दिले आहे.

एक-दोन नव्हे, तर भाजपचे डझनभर आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनीही दिले आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप सत्तेत असल्यामुळे आणि फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत येईल, असं वातावरण भासल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे ढिगभर नेते आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये सहभागी झाले होते. परंतु, आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने हे आमदार घरवापसीच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर आमदारांच्या माघारी फिरण्याला जोर येण्याची चिन्हं आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक पसंती राष्ट्रवादी पक्षाला आहे. तर काही जणांनी शिवसेना आणि काँग्रेसला पसंती दिली असल्याचेही बोलले जात आहे. भाजपच्या तिकीटावर या आमदारांनी विजय मिळवला होता, परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित जोर लावला, तर मतांच्या बळावर आपण पुन्हा निवडून येऊ, असा विश्वासही आमदारांकडून व्यक्त केला जात आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेले आमदार

बबनराव पाचपुते
राणा जगजितसिंह पाटील
नमिता मुंदडा
जयकुमार गोरे
कालिदास कोळंबकर
राधाकृष्ण विखे पाटील
नितेश राणे
काशिराम पावरा
रवीशेठ पाटील

Web Title: This Nine mla may Quit BJP

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com