पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आता अधिक वेगवान

 पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग आता अधिक वेगवान

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) आता फोर व्हिलरचा स्पीड आता 80kmph ऐवजी 120kmph ठेवता येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी समितीने सुचविलेली शिफारस मान्य केली आहे. 

द्रुतगती मार्ग सुरु झाल्यापासून या मार्गावरील वेग मर्यादा 80 होती. पण, वाहन चालकांकडून सर्रास याचे उल्लंघन होत होते. द्रुतगती मार्गावरील अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असताना, आता वेग मर्यादा वाढविण्यात आल्याने यामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 80 वेग मर्यादेवरून कायम वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद होत असे. वाहन चालकांना वेगावर नियंत्रण ठेवता येत नसल्याने दंडाला सामोरे जावे लागत होते. पण, आता समितीने सुचविलेल्या शिफारसीला खुद्द गडकरींनी मान्यता दिली असून, मार्गावरील वेग मर्यादा 120 होणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) फोर व्हिलरचा स्पीड वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. फोर व्हिलरची वेग मर्यादा 80 वरून वाढविण्यात यावी, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आता वेग मर्यादा 120 ठेवता येणार आहे. तसेच ट्रॅव्हल्स व एसटी बसलाही 100 वेग मर्यादा ठेवता येणार आहे. 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com